एखादं गाणं किती सुरेख असावं? किती सात्विक असावं? किती प्रासादिक असावं?
गानसरस्वती लतादिदीच्या कंठातून आलेले भैरवीचे सूर!
भैरवी म्हणजे हिंदुस्थानची एकात्मता, भैरवी म्हणजे हिंदुस्थानी संस्कृती-हिंदुस्थानी परंपरा..! सारे भारतीय, सार्या भारतीय भाषा, सारे भारतीय सण-उत्सव, भारतीय पेहराव, भारतीय खाद्यपरंपरा, भारतीय संगीत जिथे एकत्र येतात-एक होतात ती भैरवी! भैरवी म्हणजे हिंदुस्थानचा आणि हिंदुस्थानी रागसंगीताचा अभिमान!
त्या वीणाधारी, विद्यादानी, दयानी, दु:खहरिणी सरस्वती मातेचा वरदहस्त तुम्हाआम्हा सर्वांवर अखंड राहो एवढीच प्रार्थना!
--तात्या अभ्यंकर.
No comments:
Post a Comment