Tuesday, December 8, 2009

जाता जात नाही 'ती

दोन दिवसा पुर्वी बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन झाला. त्या वेळी निरनिराळ्या वर्तमानपत्रात बाबासाहेब, त्यांचे विचार, कार्य, आणि सध्य स्थीती ह्यावर सालाबादप्रमाणे चर्च्या झडल्या. व्रुत्त वाहिन्यांवर वाद विवाद झाले. पण मुळ ह्यातुन संवाद व्हावा हि अपेक्षा धरणे म्हणजे मुर्ख पणा आहे. असो. हे प्रकटन लिहिण्यास कारण की अश्याच एका लेखावर ('बोधिसत्वाची बांडगुळे') आधारीत धाग्यावर मी एक प्रतिक्रिया टाकली. प्रतिक्रिया थोडी अवांतर वाटली असावी म्हणुन त्यावर एका मिपाकरानी मला शालजोडीतले दिले. त्यावर परत प्रतिक्रिया देणे म्हणजे ध्याग्याचे खव बनवणे, त्या पेक्शा नविन धागा टाकलेला बरा, म्हनुन हा धागा प्रपंच......

हिंदु धर्म आणी त्यातील जाती व्यवस्था हा म्हणजे चाऊन चोथा झालेला विषय, त्यात अजुन आणी नविन काय ते लिहिणार. कोळसा किती पण उगळला तरी पण काळाच...
कर्म व्यवस्थेतुन जन्म व्यवस्थेकडे झालेली जातींची वाटचाल.. , कालानुरुप त्याला आलेले विक्रुत स्वरुप, अधिकार वर्गाने त्याचा घेतलेला फायदा, त्या मुळे शोशितांची होणारी ससेहोलपट, ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे झालेल्या धार्मिक, राजकिय क्रांत्या.... ह्या वर बरेच लिहिले, वाचले गेले आहे. आणी गंमत म्हणजे गेली पाच हजार वर्ष हि अखंड प्रक्रिया चालु असुन 'जात' मात्र जात नाहि. कारण ती आपल्या सगळ्यांच्या रक्तातच भिनली असावी. खंर तर आपण कुठल्या जातीत जन्माला यावे हे आणी कुठल्या आई वडीलांच्या पोटी जन्माला यावे हे काहि आपल्या हातात नसते. तरी देखील आपण आपल्या जाती बद्द्ल सुक्ष्म अभिमान बाळगतो. शक्य तो आपल्याच जाती बांधावांच्याशी नाते संबंध प्रस्थापित करतो. आपल्याच जाती च्या सामाजिक, ग्रुहनिर्माण संस्था स्थापन करतो. एक वर्तुळ आखतो आणी बाहेर्च्यांना त्यात प्रवेश नाकारतो. काहि अंशी ते योग्य असेलहि पण एका हद्दि प्रर्यतच. ती ह्द्द ओलांडली कि मात्र आपल्याला समाजातील अन्य जातींशी करावा लागणारा व्यवहार हा अपरिहार्य ठरतो.

सध्याच्या युगात झालेला ज्ञानाचा प्रसार आणि जागतिकिकरण ह्यामुळे जातींची बंधने गळुन पडलेली दिसत असली तरी मुळात ती तितकीच घट्ट आहेत. आपल्या कडे एका विशीष्ट जातीवाचक शब्दाच्या ऊच्चारावरुन त्या जातीत जन्मलेल्यांच्या भावना दुखावतात व त्याला कायद्याने शिक्षा पण होते. पण ह्याच जातीवाचक शब्दाने मिळ्णारे फायदे घेताना मात्र त्यांना काहिच कमीपणाचे वाटत नाहि!!! सर्वात हास्यास्पद प्रकार म्हणजे गेली पाच दशके महाराष्ट्रावर राज्य करणारी जात सुद्धा आरक्षणाची मागणी करते. ब्राम्हण, मराठा, दलित, मागासवर्गीय, इत्तर मागासवर्गीय सर्वच आपापली अधिवेशने दरवर्षी भरवतात आणी त्यांना खतपाणी देण्यासाठी उथळ राजकिय मंडळी तत्पर असत्तात. मग असे करतांना आपण पो॑राणीक, धार्मिक, ए॑तिहासिक, राजकिय थोर विभुतींना पण त्यांच्या उच्च विचारसर्णीतुन खेचुन आणुन आपल्या पातळीवर आणुन बसवतो आणी मग निर्दयी राज्यकर्त्यांना खंद्णारा परशुराम फक्त कोकण्स्थांचा होऊन रहातो, शिवछत्रपती वर ९६ कुळी आपला हक्क सांगतात आणी कर्मकांडविरहित ज्ञानाचा झरा असलेला तथागत फक्त नवबो॑धांचा होऊन रहातो. अश्या वेगळ्या चुली मांडुन खरंच एकसंध समाज निर्माण होणार आहे का? आणि त्याहि पेक्शा तो तसा निर्माण व्हावा अशी आपली सगळ्यांची प्रामाणिक ईच्छा आहे का?

मुख्य जातीं मधला भेदभाव सोडून दया, पण एकाच जातींतील उपजातीं मधला भेदभावा बद्द्ल बोलताना कोणीच दिसत नाही. व्रुत्तपत्रातील वधुवर संशोधनाच्या जाहिराती पहा. सर्व मुख्यजातींच्या पोट्जातींच्या वधु/वरांना त्यांच्याच पोट जातीतील वधु/वर हवे असतात. असे का? हिंदुंचे सोडुन द्या पण बो॑ध्द, मुसलमान, ईसाई ह्या इत्तर धर्मांत सुद्धा हेच चालते. माझी मुळची ब्राम्हण पण नंतर ईसाई झालेली एक मे॑त्रीण होती. तीने लग्न करताना सुद्धा ब्राम्हण आडनावाच्या ईसाई मुलाशी लग्न केले. हा प्रकार एखाद्याचा वे॑यक्तीक प्रश्न असला तरी हास्यास्पद नाही वाटत? माझ्या जेवणाच्या डब्यातली बुर्जी आणि सागुती चवीने खाणार्या मुलीला जेव्हा मी लग्ना संबंधी विचारले तेव्हा 'माफ कर, आमच्या कडे नाहि चालणार, घरी कुकर मध्ये मटण शिजतेय अशी कल्पनाच मी करु शकत नाहि' असे म्हणुन जेव्हा माझी जात दाखवली जाते तेव्हा मात्र मी हतबुद्ध होतो. पण तिच्या या वागण्यासाठी संपुर्ण जातीलाच दोष देणे म्हणजे माझा मुर्ख पणाच ठरेल.

आजच्या आधुनिक युगात जन्माला येणार्या नविन जातींचे काय? आज वे॑द्यकिय महाविद्यालयात पदवी साठी प्रवेश मिळणे फक्त वे॑द्यकिय व्यव्सायिकांच्याच मुलांनाच शक्य होत आहे. राजकारणात सुदधा हेच चालु आहे. कारण फ्क्त पे॑सा. ह्या प्रस्थापित होत चाल्लेल्या नविन जातीव्यवस्थे बद्द्ल मात्र समाजात काहिच प्रतिक्रिया उमटत नाहि......

माता सरस्वती.

एखादं गाणं किती सुरेख असावं? किती सात्विक असावं? किती प्रासादिक असावं?

गानसरस्वती लतादिदीच्या कंठातून आलेले भैरवीचे सूर!

भैरवी म्हणजे हिंदुस्थानची एकात्मता, भैरवी म्हणजे हिंदुस्थानी संस्कृती-हिंदुस्थानी परंपरा..! सारे भारतीय, सार्‍या भारतीय भाषा, सारे भारतीय सण-उत्सव, भारतीय पेहराव, भारतीय खाद्यपरंपरा, भारतीय संगीत जिथे एकत्र येतात-एक होतात ती भैरवी! भैरवी म्हणजे हिंदुस्थानचा आणि हिंदुस्थानी रागसंगीताचा अभिमान!

त्या वीणाधारी, विद्यादानी, दयानी, दु:खहरिणी सरस्वती मातेचा वरदहस्त तुम्हाआम्हा सर्वांवर अखंड राहो एवढीच प्रार्थना!

--तात्या अभ्यंकर.